पंढरपूर (दिनेश खंडेलवाल ) - गेल्या दहा वीस वर्षांत पंढरपूरच्या लोकसंख्येच्या मोठी वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील स्थलांतरीत पंढरपूरात दाखल होत आहेत.परिणामी लोकसंख्येच्या मानाने रोजगार उपलब्ध होत नसल्याने बेकारी, बेरोजगारीसारखे प्रश्न निर्माण झाले आहेत. या बेरोजगारीवर मात करण्यासाठी छोटे  मोठे व्यवसाय करीत आहेत, पण त्याची परिणती अतिक्रमणात होत आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन  अपघाताचे, भांडण तंट्याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे तरुण वर्गामध्ये उदासीनता आहे परिणामी तरुण वर्ग इझीमनीच्या नावाखाली गुन्हेगारीकडे आकर्षित होत असल्याने कुटुंब व समाजव्यवस्थेची हानी होण्याची शक्यता आहे.

वरील विषयाचा विचार करता पंढरपूरात एम.आय.डी.सी. ची अत्यंत गरज आहे. तरी आपण सकारात्मक विचार करून यासंदर्भात आश्वासन देऊन पुढील कार्यवाही करावी. याबाबतीत रोडमँप तयार करून टाईमबाऊंड पद्धतीने न्याय घ्यावा अन्यथा दि.१२फेब्रुवारी २०१९ रोजी धरणे आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी असे    महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापूर जिल्हा संघटक यांनी सागर बडवे सांगितले .यावेळी मनसेचे विभाग अध्यक्ष अमोल घोडके, आमित लखिरी, अजय जगताप उपस्थित होते

 
Top