पुलवामा येथे जवानांवर झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर देखील पाकिस्तानच्या बाजूने वक्तव्य करणारे पंजाबमधील काँग्रेसचे पर्यटन मंत्री नवजोत सिंग सिद्धू यांना कपिल शर्मा शो मधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सिद्धू याने दहशतवादाला कोणताही धर्म व देश नसतो असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी सिद्धूचा खरपूस समाचार घेत त्याला कपिल शर्मा शो मधून हाकलण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर ट्विटरवर #BOYCOTTSIDDHU हा ट्रेंड देखील सुरू झाला होता.दहशतवाद हा कोण्या एका धर्माचा किंवा देशाचा नसतो, त्यामुळे शिव्या घालून काहीही होणार नाही असे वक्तव्य सिद्धू यांनी केले होते. त्यांचे हे वक्तव्य जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. खास करून ट्विटरवरून त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे. काहींनी तर त्यांना देश सोडून जाण्याचा सल्लाही दिला आहे.
 
Top