वादळी दृष्टीकोनातून:

सर्वाना विश्वास नव्या युगाचा शिवराया जन्मा आले होते 

हर हर महादेवाचा गजर घुमवत  स्वराज्यासाठी    मावळे पेटले होते !!

कण कण भूमी महाराष्ट्राची ,अरबी समुद्रही खवळून उठला होता ,

सह्याद्री,सातपुडा  कडेकपारी जळी स्थळी शिवरायाच दिसत होते !!

पाटील पटवारी सुभेदार फंदफितुर साऱ्यांनाच घाम फुटला होता ,

बलात्कारी अन्यायी हातांचे कलम करताना धडा त्यांना मिळत होता !!

 रयतेचा  राजा फक्त शिवबा ,मातोश्रींच्या संस्काराचा सुगंध लाभला  होता,

युगे युगे तोच आदर्श ,तोच  प्रेरणा ,तोच  स्वाभिमान  हृदयी नोंदवला होता !!

असा राजा पुन्हा होणे नाही, हेच सत्य सुर्यासमान

 तोच आमुचा अभिमान ,

असे आले किती गेले किती ना पर्वा कोणा  राजा शिवबाच आमुच्या  हृदयी विराजमान !!


गोफणगुंडा :


निम्मं तुम्ही निम्मं आम्ही संधी नामी काम कमी 

हीच तर युती

आघाडीची हमी नेते सोडून बाकीसर्व डमी"


आनंद कोठडीया, जेऊर ९४०४६९२२००

 
Top