मुळेगाव ता. द सोलापुर,दिनांक १७ फेब्रूवारी २०१९ - सर्व सामान्य जनतेला, शेतकऱ्यांना वेठीस धरून दिशाभूल केलेल्या सरकारला धडा शिकवा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री  अशोक चव्हाण यांनी आज सोलापूर येथील मुळेगाव तांडा येथील बंजारा समाज मेळाव्यात बोलताना केले.

 यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे , आमदार सिद्धाराम म्हेत्रे,  माजी आमदार दिलीप माने, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, सोलापुर शहर कांग्रेस अध्यक्ष प्रकाश वाले, माजी महापौर अलकाताई राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी, सुभाष चव्हाण, बागलकोटचे बलराम नाईक, मोहन चव्हाण नांदेड, पंडित राठोड आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले ,राज्यात दुष्काळ असून सरकारने शेतकऱ्याला गाजर दाखवले शेतकरी आत्महत्या करीत आहे. सरकार मात्र झोपा काढत आहे. बंजारा समाज नेहमी काँग्रेसच्या पाठीशी आहे बंजारा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी तुमच्या पाठीशी आहेत .  

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की उमाकांत राठोड हे आमचे सहकारी होते त्यांच्या निधनाने समाजामध्ये पोकळी निर्माण झाली त्यांच्या मुलाने विजयकुमार उमाकांत राठोड हे युवकांना एकत्रित करून सामाजिक कार्य करीत आहेत समाजातील युवक पारंपरिक व्यवसाय सोडून शिकून मोठ्या हुद्द्यावर काम करीत आहेत हे उल्लेखनिय बाब आहे. 

आमदार म्हेत्रे बोलताना म्हणाले, तांडा तेथे समाज मंदिर बांधून दिले. रस्ते, दिवे, पाणीपुरवठा आदी कामे आम्ही करीत आलो आहोत उमाकांत राठोड यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटीबद्ध आहे .

यावेळी अलकाताई राठोड, मोतीराम राठोड, यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक व आभार प्रदर्शन विजय राठोड यांनी केले. सूत्रसंचालन प्रसिद्धिप्रमुख सातलिंग शटगार यांनी केले.

 
Top