पंढरपूर (दिनेश खंडेलवाल ) --फलटण आगाराची गेली २१ वर्षापासून फलटण - अक्कलकोट ही बस सेवा सुरू आहे ही बस सोलापूर येथे सकाळी ११ वाजता व जलद पोहचत असल्याने जवळजवळ नातेपुते येथून मोठया प्रमाणावर नोकर वर्ग या बसने प्रवास करीत आहे तसेच या मार्गावर अक्कलकोट मंदिरात जाणारी पहिली बस असल्याने फलटण पासून या बसला भाविक ही मोठ्या प्रमाणात असतात या बरोबरच या बसचे चालक व वाहक यांचेकडून प्रवाशांना अतिशय विनम्र सेवा दिली जाते यामुळे या बसला अतिशय चांगला प्रतिसाद आहे परंतु या बसला सावलेश्वर टोल नाक्यावर पास नसल्याने त्या ठिकाणी प्रवाशांचा वेळ जात होता परिणामी कार्यालयात जाण्यासाठी उशीर होऊ लागला. यासाठी पंढरपूर सोलापूर प्रवाशी ग्रुपकडून फलटण आगाराशी गेल्या वर्षंभरापासून पास काढण्यासाठी सतत पाठपुरावा केला. या आगाराकडून पास काढण्यास टाळाटाळ केली जात होती व दखल घेतली नाही यामुळे आपले सरकार या पोर्टल वर याबाबत तक्रार देण्यात आली होती तसेच नुकतेच राहुल कुंभार हे हजर झाले त्यांचकडेही पास बाबत पाठपुरावा केला. त्यांनी याची तात्काळ  दखल घेऊन सदर बसचा पास काढून देण्यात आला. यामुळे प्रवाशांचा दररोजचा वेळ वाचला व महामंडळाच्या खर्चात बचत केली याचे अवचित्त साधून २६ जानेवारी २०१९ रोजी फलटण येथे जाऊन पास काढून प्रवाशाच्या वेळेत व खर्चात बचत केली म्हणून आगार प्रमुख मा राहुल कुंभार साहेब यांचा प्रवाशी ग्रुप चे अध्यक्ष कुमार नरखडे,प्रकाश घोडके उपाध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच प्रवाशांना  ज्याच्यामुळे २१ वर्षे विनम्र सेवा घडली अशा श्री पोपट कदम, भिवरकर चालक व सौ अश्विनी गोसावी,रुपाली पालवे, अशोक लवटे,गणेश सोलवनकर या वाहकांचा संघटनेच्या व ग्राहक पंचायत यांच्यावतीने गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

 

यावेळी स्थानक प्रमुख हणमंत फडतरे ,वाहतूक निरीक्षक दत्तात्रय महानवर, सहा वाहतूक निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, वाहतूक नियंत्रक अमोल वडगावे, पंकज वाघमारे, कामगार सेना सचिव मुळीक,अध्यक्ष कामगार संघटना विवेक शिंदे व इतर कर्मचारी तसेच सातारा जिल्हा ग्राहक पंचायत विभागीय संघटक दिलीप भोसले ,तालुका उपाध्यक्ष संजय जाधव, सहसंघटक शिवाजीराव नाईक निंबाळकर ,शाहूराजे भोसले उपस्थित होते .  फलटण आगारातील वाहक श्रीपाल जैन यांनी आभार मानले.
 
Top