खर्डीमध्ये शिवराज ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर व क्रिकेट सामन्यांचे उदघाटन

पंढरपूर- खर्डी (ता. पंढरपूर)मध्ये शिवराज ग्रुपच्या वतीने सार्वजनिक ‘शिवजन्मोत्सव सोहळा २०१९’  सुरुवात करण्यात आली असून यानिमित्ताने रक्तदान शिबिर व क्रिकेट सामन्यांचे उदघाटन स्वेरी तथा गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांच्या हस्ते करण्यात आले. 

       प्रारंभी शिवप्रतिमेचे पूजन विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शन करताना  विश्वस्त प्रा. सुरज रोंगे म्हणाले की, ‘सध्याच्या युवकांना मार्गदर्शनाची गरज असून आपल्या उपक्रमात मी आनंदाने व अधिक उत्साहाने सहभागी होत असून सध्याचे युवक विधायक उपक्रम राबवीत आहेत ही बाब महत्वाची आहे. आपल्या घरातील आई, वडील व घरातील जेष्ठ नागरिक कामावर गेलेली असताना घरातील मुलांना नेमके काय केले तर कसा फायदा होईल? याचे जीवनाच्या फायद्याच्या दृष्टीने नेमके काय करावे हे माहित नसते आणि या ग्रुपच्या माध्यमातून योग्य संस्कार आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर युवकांना एक निश्चित दिशा मिळेल. आत्तापर्यंत ग्रुपमुळे योग्य दिशा व योग्य संस्कार मिळाले असून यापुढे देखील शिवराज ग्रुपचे कार्य अखंडीत ठेवावे. सर्वांनी मिळून सर्वांच्या सहकार्याने ग्रुपचे कार्य करू.’ यावेळी विश्वस्त प्रा. रोंगे यांनी क्रिकेट सामन्याच्या उदघाटनावेळी उत्कृष्ठ फलंदाजी देखील करून महाविद्यालयीन जीवनातील क्रिकेटच्या खेळाबाबतच्या आठवणी सांगितल्या. त्यांनी रक्तदान देखील केले. याप्रसंगी खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक, आबासाहेब रोंगे-पाटील, भारत पाटील, शरद रोंगे-पाटील, सचिन रोंगे, प्रकाश जाधव, राहुल रोंगे, अमोल पवार, संतोष मोरे, मोहन रोंगे, समाधान रोंगे, सीताराम रोंगे, महेंद्र रोंगे, प्रशांत रोंगे, निरंजन खंडागळे, स्वप्नील रोंगे- पाटील, दीपक पाटील, युवराज रोंगे, आपासाहेब रोंगे, सुरेश कुसमुडे, योगेश पाटील, विकास पाटील, भारत रोंगे, दत्तात्रय येडगे, ज्योतिराम दिघे, गणेश जाधव, श्रीकांत रोंगे, सचिन चव्हाण, गणेश शिनगारे, ग्रुपचे आदी सदस्य उपस्थित होते. 

 
Top