नवी दिल्ली : 
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय वायुसेनेकडून पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या कारवाईनंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला. 

या दरम्यान पाकिस्ताननं या हल्ल्याचा गुन्हेगार दहशतवादी मसूद अजहर याच्याबद्दल गप्पच राहणं पसंत केलं होतं. परंतु, आता मात्र पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी मसूद अजहर पाकिस्तानात असल्याची कबुली दिलीय. इतकंच नाही, तर मसूद खूप अस्वस्थ असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

 
Top