पंढरपूर- येथील क्रांती महिला मंडळाने या वर्षी २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे.त्यानिमित्तक्रांती ज्योती सप्ताहाचे आयोजन केल्याची माहिती संस्थापक अध्यक्षा सौ. राणी दोशी व सौ. नीलम कोठारी यांनी दिली.

क्रांती महिला मंडळ गेल्या २५ वर्षापासून कार्यरत असून आजपर्यंत अनेक सामाजिक, वार्षिक कार्यक्रम करत आहे. दिनक १ मार्च ते ७ मार्च या कालावधीत विविध उपक्रम राबवीत आहे. १ मार्च फडे जैन मंदिरामध्ये सकाळी ७ ते रात्री ७ भक्तांबर त्रोग पठण, आरती आहे. बेसिक ते अॅड्व्हान्स केक क्लास, रक्तदान, देहदान, अवयवदान, नेत्रदान यासंबंधी डॉ.शर्मिली शहापुरे, श्री दर्शने, श्री वल्लभजी करमळकर या मान्यवरांची व्याख्याने मिस मॅच स्पर्धा, जैन समाजातील ७० ओलांडलेल्या वृद्ध महिलांचे गेट-टू-गेदर सत्काराचे नियोजन केले आहे. तसेच वृद्धाश्रम, पालवी, रिमांड होम, धर्मशाळा, मुक-बधीर,, मातीबंध येथिल मुलांचे सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहे.

महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक ७ मार्च रोजी सफाई कामगार, परिचारिका, दाई, समाजसेविका व शिक्षिकांचा सत्कार करून सामाजिक ऋणातून अंशतः उतराई होण्याचा प्रयत्न करणार आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.माधुरी जोशी उपस्थित राहणार असून डॉ सौ.वर्षा काणे, अध्यक्षा स्त्री विषयाला स्पर्शणारे व्याख्यान देत आहेत. तसेच महिलांच्या जिवाभावाच्या सासू-सुनाची बदलती नातीया विषयावर परिसंवाद ठेवला आहे. तरी सर्व कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याचे आव्हान मंडळाच्या अध्यक्षा सौ. ममता शहा व सायोजीका सौ. प्रज्वल शहा यांनी केले आहे. संपर्क- सौ. सीमा कोठारी – ७०२००३२४७० दिनांक ४ मार्च ते ७ मार्च पर्यंतचे सर्व कार्यक्रम सावरकर वाचनालय पंढरपूर येथे होतील.

 
Top