महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या अर्भसंकल्पात रोजगारास चालना देणारी १६ महामंडळे सक्षम बनविण्यास पाऊले उचलली आहेत. याखेरीज दळणवळणास चालना, रस्ते विकास, दुष्काळावर उपाययोजना, शेतीमालावर अनुदान, योग्य ते अर्थसहाय्य उपलब्ध केले आहे. ७ वा वेतन आयोग, दारिद्र्य रेषेवरील शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य, पोलिसांसाठी घरे, पंतप्रधान आवास योजनेमार्फत सर्वांना घरे यासाठी तरतूद करून जनतेला दिलासा दिला आहे.

नवतेजस्विनी प्रकल्पामार्फत ग्रामीण महिलांसाठी नवीन उपक्रम करण्यात येणार आहे. याखेरीज छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, बाळासाहेब ठाकरे स्मारक याला चालना दिली आहे. साहित्य संमेलनासाठी, नाट्य संमेलनासाठी अनुदान दुप्पट केले आहे हे स्वागतार्ह आहे. शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी हा अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

 
Top