चेन्नई :मक्कल मनद्रम नावाचा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुपरस्टार रजनीकांत यांनी गेल्या वर्षी तामीळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला. ते २०१९ ची लोकसभा लढवतील, असा अंदाज राजकीय विश्‍लेषक वर्तवत होते; पण रजनीकांत यांनी आज एक पत्रक प्रसिद्ध करत त्यांचा पक्ष २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की माझ्या पक्षाने कोणत्याही पक्षाला येणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे माझा आणि माझ्या पक्षाचा कोणताही फोटो, झेंडा कोणीही आपल्या प्रचारासाठी वापरू नये. जे तामीळनाडूचा पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न करुन हा प्रश्‍न कायमचा निकालात काढतील, त्यांच्यावर जनतेने विश्‍वास ठेवून त्यांना मतदान करावे, असे आवाहन केले आहे.

 
Top