पंढरपूर -योग विद्या धाम, पंढरपूर च्या वतीने सावरकर वाचायला येथे मंगळवार १२ फेब्रुवारी सकाळी ६.१५ वा रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून सामुहिक ५१ सूर्यनमस्कार घालण्याचा  उपक्रमाचे आयोजन केले आहे, तसेच नगरपरिषद संचलीत लोकमान्य विद्यालयातही विद्यार्थ्यांसाठी सकाळी ७.४५ वा सूर्यनमस्कार प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.
          वरील दोन्ही कार्यक्रमात पंढरपूर शहर व परिसरातील,योग प्रेमी नागरिक तसेच सर्व योग शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन योग विद्या धाम चे कार्याध्यक्ष अशोक ननवरे व नगरसेवक विवेक परदेशी यांच्या वतीने करण्यात आले.
 
Top