राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण करताना 'उज्ज्वला योजने'अंतर्गत दिलेल्या एलपीजी गैस सिलिंडरच्या रिफिलींगचे प्रमाण अत्यल्प असल्याचे सांगितले.तसेच 'आयुष्यमान भारत'अंतर्गत केंद्राकडून राज्यांना दिला जाणारा निधीही उशीर येत असल्याचा मुद्दा मांडला.

    तसेच जस्टीस रेड्डी समितीच्या शिफारशींनुसार सैनिकांसाठी 'वन रँक वन पेन्शन'ची अंमलबजावणी करावी. याशिवाय पारधी, लिंगायत आणि धनगर या समाजांसाठी आरक्षणाची तरतूद करावी.महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात 'मनरेगा' अंतर्गत रोजगार वाढवावा,या मागण्या केल्या असे आपल्या ट्विटर अकाउंटवर खासदार सुप्रिया सुळे यांनी लिहिले आहे .

 
Top