बुलडाणा - मोताळा येथील मोहेंगाव येथे २००, ५०० आणि २००० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या बनावट नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली तर चौघे फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शेतातून कोट्यवधींच्या बनावट नोटांनी भरलेली बॅग बोराखेडी पोलिसांनी जप्त केली. मोहेंगावनजीक बोराखेडी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर बोराखेडी पोलिसांनी येथील आश्रम शाळेमागील शेतातून कोट्यवधींच्या बनावट नोटांनी भरलेली बॅग जप्त केली. पोलिसांनी जप्त केलेल्या नोटांचे मूल्य किती आहे, हे अद्याप समजू शकले नाही. या बनावट नोटांची मोजदाद सुरू करण्यात आली आहे. जवळपास एक कोटी रुपयांचे हे बनावट चलन असल्याचे सांगण्यात येत आहे.  पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. पोलिसांना संध्याकाळी गुप्त माहिती मिळाली. मोहेंगाव या ठिकाणी नोटांचा व्यवहार सुरू आहे. त्यामध्ये जवळपास एक कोटींच्या बनावट नोटा आहेत. जिथे या नोटांची डील होत होते, त्या ठिकाणी डील करणाऱ्यांमध्ये वाद झाला. त्याचवेळी पोलिसांनी तेथे छापा मारला. यावेळी एक जण पोलिसांच्या हाती लागला. 

ताब्यात घेण्यात आलेल्या नोटांचे मोजमाप स्थानिक ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी असलेल्या २ पंचासमोर पोलिसांकडून करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांकडून मोताळा पोलीस ठाण्यात अप न.७४/१९ कलम ४२०, ४८९अ, ४८९ब, ४८९क, ३४ नुसार गुन्हे नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात ६ ते ७ आरोपी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 
Top