येवती ता-मोहोळ येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शाखेचे उदघाटन जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्या हस्ते  मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण,जिल्हाउपाध्यक्ष सचिन गंगथडे,तालुका अध्यक्ष संतोष जाधव,संतोष गंगथडे सर यांच्या सह विविध मांन्यवरांनी आपले मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले.

यावेळी शाखाध्यक्षपदी दीपक खुर्द, उपाध्यक्षपदी जोतिराम खुर्द,खजिनदारपदी समाधान खुर्द,सचिवपदी अक्षय खुर्द,कार्याध्यक्षपदी सुरज खुर्द, संघटक पदी विकास शिंदे,सहसचिवपदी अमर शिंदे,खंबीर साथ पदी आनंद खुर्द यांच्या निवडी करण्यात आल्या. याप्रसंगी मराठा महासंघाचे पंढरपूर शहराध्यक्ष अमोल पवार,रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड,सुरज पडवळे,सोमनाथ झेंड यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते येवती ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top