संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त कै  नारायणराव धोत्रे मित्र मंडळाचेवतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आला आहे . सोमवारी तारीख २५ फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते नऊ श्रींचे पूजन अभिषेक, सकाळी दहा ते बारा पर्यंत श्री.रोकडे  महाराजांचे  हरिकिर्तन होणार असून बारा वाजता माजी आमदार सुधाकरपंत परिचारक चेअरमन पांडुरंग सहकारी साखर कारखाना यांच्या हस्ते पुष्पवृष्टी होणार आहे पुष्पवृष्टीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष दगडू धोत्रे यांनी केले आहे. 
हा कार्यक्रम कै नारायणराव धोत्रे सांस्कृतिक भवन, महावीर नगर पंढरपूर येथे होणार आहे .या कार्यक्रमाचे आयोजन शिवरत्न तरुण मंडळ , रामजाने तरुण मंडळ ,आदी शक्ती तरुण मंडळ ,न्यू वडार समाज गणेशोत्सव तरुण मंडळ ,न्यु वडार समाज नवरात्र महोत्सव तरुण मंडळ ,श्री गजानन महाराज भक्त मंडळ ,न्यु वडर गल्ली,पंढरपूर यांनी केले असून या सोहळ्याचे संयोजक कै नारायणराव धोत्रे मित्र मंडळ आहे. 
 
Top