पंढरपूर येथे काश्मीर पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड चे सोलापूर जिल्हाअध्यक्ष अमित डोंबे यांनी नियोजन केले होते.

त्यावेळी शाहिद कुणालगीर गोसावी यांचे वडील मुन्नागीर गोसावी,प्राचार्य अशोक डोळ सर(महा प्रदेश काँग्रेस ओबीसी सचिव),मिलिंद आढवळकर(जिल्हा उपाध्यक्ष), शहर अध्यक्ष मधुकर फलटणकर, शहर काँग्रेस उपाध्यक्ष अमित अवघडे व यंग ब्रिगेडचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

    त्यावेळी मार्गदर्शन करताना शाहिद मेजर कुणालगीर गोसावी यांचे वडील मुन्नागीर गोसावी यांनी भारताच्या अखंडतेसाठी कलम ३७० रद्द करणे हीच जवानांना खरी श्रद्धांजली ठरेल असे उदगार काढले.

 यावेळी जिजामाता उद्यान परिसर भारत माता की जय,वंदे मातरम या घोषणांनी दणाणून गेला होता. 

 
Top