मुंबई  –
सन२०१९-२० चा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मांडला.राज्य शासनाने मांडलेल्या या अंतरिम अर्थसंकल्पात शेती आणि पायाभूत सुविधांचा विकास यावर भर दिला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी व शाश्वत शेती विकासाला चालना मिळण्यासाठी हा अंतरिम अर्थसंकल्प उपयुक्त ठरणार आहे .या अर्थसंकल्पात शेती, आरोग्य, पायाभूत सुविधा, मागास वर्ग यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. महसुली उत्पन्न वाढवून तूट कमी करण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली असल्याचे यातून प्रतिबींबीत होते. राज्यातील रस्त्यांचा विकास, मेट्रो प्रकल्प, समृद्धी महामार्ग यासाठी केलेली तरतूद ही राज्याचा विकासाचा वेग वाढविण्यासाठी पूरक आहे, अशी प्रतिक्रिया सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
 
Top