सर्व पंढरपूरकरांच्या वतीने हनुमानपेठ (वजिराबाद चौक) येथे अवंतीपूरच्या दहशतवादी हल्ल्यातील वीर जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे. मंगळवार दि. १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर येथे दंडावर काळ्या फिती बांधुन या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येईल व मेणबत्त्या प्रज्वलीत करुन जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येईल.

पुलवामाकडे निघालेल्या सीआरपीएफच्या जवानांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, या हल्ल्यात चाळीसहून अधिक जवान शहीद झाले. शहीदांच्या वीर मरणामुळे सबंध देश शोकसागरात बुडालेला आहे.  

या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी व जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंढरपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन धिरज म्हमाने, ओंकार बसवंती, अनिरुध्द बडवे व  भगवान वानखेडे यांनी केले आहे.
 
Top