भाळवणी (दिनेश खंडेलवाल ) -पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे शिवसेना शाखा भाळवणी व जिल्हा परिषद गटाच्या वतीने येथील श्री शाखंभरीदेवीच्या पंटागणात हिंदूह्दयसम्राट शिवसेना प्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रतिमा पूजन शिवसेना जिल्हा नेते साईनाथ अंभगराव व  भैरवनाथ कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे,पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील,गटविकास आधिकारी घोडके,सरपंच सौ.रूपाली सराटे आदि मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी २८ तारखेस सकाळी गजीढोल खेळ व संध्याकाळी १३६ परडीचे पूजन करण्यात आले.२९ ला संध्याकाळी सणसर येथील  हभप सावता केशव फुले यांचा भारूडाचा कार्यक्रम संपन्न झाला,३० ला मराठी पाऊल पडते पुढे ,३१ ला संध्याकाळी पुरंदर येथील किर्तनकार सौ.गिताजंली झेंडे - कुलकर्णी यांचे किर्तन झाले.१ ला किशोरवयीन मुलींचे हिमोग्लोबीन तपासणी व औषधोपचार शिबीरात ४३३ मुलींचे हिमोग्लोबीन मोफत तपासण्यात आले.यावेळी रसिकांनी व महिलांनी मोठी गर्दी  केली होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन शिंदे यांनी केले .आभार आनंद देशपांडे यांनी मानले.
 
Top