पंढरपूर-(संतोष हलकुडे) पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करताना सध्याच्या पिढीची वाताहत होत असतानाच स्वेरीच्या एम.बी.ए. विभागामधील विद्यार्थ्यांनी मात्र अनपेक्षितरित्या ‘रोटी डे’ साजरा करून सर्वांना सुखद धक्का दिला.

अभियांत्रिकी महाविद्यालया अंतर्गत असलेल्या एम.बी.ए.चे विभाग प्रमुख प्रा. करण पाटील यांनी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली एम.बी.ए. मधील प्रथम व द्वितीय वर्ष मधील विद्यार्थ्यांजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या. पाहता पाहता १४ फेब्रुवारी रोजी प्रत्येकांनी स्वतःच्या घरून चपात्या ,भाकऱ्या ,मटकीची उसळ घेऊन ११० विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी संभाजी वलटे यांच्यासह एम.बी. विभागानी गोपाळपुरातील ‘श्री संत तनपुरे महाराज मातोश्री वृद्धाश्रम’ गाठले. तेथील सर्व वृद्धांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. 
वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक धनंजय राक्षे प्रास्तविकात म्हणाले, ‘आज ‘व्हेलेंटाईन डे’ जगभर साजरा करत असताना स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने ‘मातोश्री वृद्धाश्रमा’मध्ये भूकेलेल्यालांना ‘अन्नदान’ करून ‘रोटी डे’ साजरा करण्यासाठी आले असून स्वेरीची प्रत्येक वेळी सहकार्य लाभत असते.’

प्रा. प्रवीण मोरे यांनी यावेळी मातोश्री वृद्धाश्रमाप्रमाणे मात्या पित्यांना वृद्धाश्रमात पाठविण्याची वेळ येणार नाही, असे सर्वांकडून वचन घेतले.यावेळी शाम करोडे यांच्या हस्ते विभागप्रमुख प्रा. करण पाटील यांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थी श्रीकृष्ण जोशी यांनी प्रत्येकी पाच किलो गहू व तांदूळ दिले.

त्यानंतर रिद्धी-सिद्धी गणेश मंदिरामागे असलेल्या कुष्टरोगी वसाहतीत तसेच दत्त घाटानजीकच्या पायरीवरील सर्व भिक्षुकांना अन्नाचे पॅकेट देण्यात आले.स्वेरीने ‘रोटी डे’ च्या रूपाने हा अदभूत कार्यक्रम साजरा केला.  
Top