भारताने पाकिस्तानचा प्रश्न कायमचा निकाली काढावा, काश्मीर प्रश्न कायमचा सोडवावा ,राम मंदिराप्रमाणे हे प्रश्न पुढच्या निवडणुकांपर्यंत शिल्लक ठेवू नका असे आवाहन शिवसेनेने केले आहे. पाकव्याप्त काश्मीरवर तरी तिरंगा फडकवाच असेही शिवसेनेने सुचवले आहे.पाकिस्तानचा पूर्ण खात्मा होईल, फक्त ‘हुल झपाटा’ देऊन त्यांना सोडणार नाही ही भावना प्रबळ आहे. निदान पाकव्याप्त कश्मीरवर तरी नक्कीच तिरंगा फडकेल अशीच रणनीती, युद्धनीती आखल्याशिवाय पंतप्रधान मोदी मागे हटणार नाहीत याबाबत जनतेच्या मनात विश्वास आहे, आता त्यांनी मागे हटू नये असेही शिवसेनेने म्हटले आहे.देशातील विरोधी पक्षाने दिल्लीत घाईघाईने बैठक बोलावून काही मुद्दे उपस्थित केले. सैनिकी कारवाईचे राजकारण करू नका, हा त्यातला प्रमुख मुद्दा आहे. पाकिस्तानचा साफ कचरा करा व कश्मीर प्रश्नाचा निचरा करा! देशाचे हे एवढेच मागणे आहे. राममंदिराप्रमाणे पुढच्या निवडणुकीपर्यंत हे प्रश्न शिल्लक ठेवू नका ,अशी सामनाच्या अग्रलेखातून ही मागणी करण्यात आली आहे.
 
Top