पंढरपूर -स्वर्गीय वसंतदादा काळे यांच्या अमृतमहोत्सवी जयंती  निमित्त जनकल्याण हॉस्पिटल , पंढरपूर येथे  आज वसंतदादा काळे यांच्या प्रतिमेचे पूजन  फिजिशियन डॉ   मिलिंद चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.प्रस्तविकात व्यवस्थापक भारत शिंदे यांनी वसंतदादा यांची माहिती दिली.जनकल्याण हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधीर शिवाजी शिंनगारे यांनी स्वर्गीय वसंतदादांच्या आठवणींना उजाळा दिला . दि.१७ व १८ फेब्रुवारी रोजी मोफत सर्व रोग निदान व औषधोपचार शिबिर आयोजित केले आहे, यांचा तालुक्यातील सर्व जनतेला फायदा झाला पाहिजे यासाठी सर्वानी सहकार्य केले पाहिजे असे   सांगितले.

    यावेळी हॉस्पिटलच्या CMO डाॅ. वैभवी भोसले,  व्यवस्थापक भारत शिंदे, समन्वय अधिकारी सद्दाम मणेरी, जनसंपर्क अधिकारी डॉ. सतिश बागल,डॉ. प्रियांका येळे,आण्णासो डुबल, अकाऊंट विभाग प्रमुख सौ.गौरी माशाळ,महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनाचे आरोग्य मित्र उमेश कौलगे,मधुकर राजगुडे  तसेच हाॅस्पिटलमधील डाॅक्टर ,नर्सिंग स्टाफ व पेंशटचे नातेवाईक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पुजा सावंत यांनी केले. आभार सौ. संजीवनी कांबळे यांनी मानले.

 
Top