MIT च्या बेकायदा जमीन खरेदी रद्द मुळ मालकाच्या नावे जमीन

    पंढरपूर (दिनेश खंडेलवाल )- पंढरपूर  तालुक्यातील वाखरी  येथील विश्वशांती गुरूकूल ( MIT ) च्या बेकायदेशीर जमिन खरेदी रद्द करुन मुळ मालकाच्या नावे संपुर्ण जमिन तहसिलदार मधूसूदन बर्गे यांनी आदेश काढुन केला.     
       याबाबत सविस्तर माहीती अशी की संस्थेचे विश्वस्त विश्वनाथ कराड यांनी मागील काही दिवसांपुर्वी छत्रपती शिवराय यांच्या पुतळा बसविणे बद्दल वादग्रस्त विधान केले होते. यावर संभाजी ब्रिगेड च्या वतीने आक्षेप घेत आंदोलन पुणे सोलापुर व पंढरपुर आदी ठिकाणी करण्यात आले होते. त्याचाच भाग म्हणुन संभाजी ब्रिगेड पंढरपुर यांनी १)बेकायदा जमिन खरेदी २)बेकायदा पुणे पंढरपुर महामार्गावरिल कमान ३)सोनके तिसंगी तलावावरिल कँनाँल ३ डी वरील फाटा क्रमांक २१ वरील अतिक्रमण हटवणे ४)उजनी उजवा कालवा फाटा क्रमांक २५ डी वाय वरील अतिक्रमण हटवा या प्रमुख मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड पंढरपुर तालुक्याच्या वतिने मा.तहसील कार्यालय पंढरपुर येथे दि ७/१/२०१९ रोजी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी तहसीलदार पंढरपूर यांनी फेरफार रद्द करा असा आदेश तलाठी वाखरी यांना दिला होता. त्याचा सातत्याने पाठपुरावा करून 7/12 दप्तरी मुळ मालक आसलेले तुळसिदास कोंडाजी जाधव ,रामदास कोंडाजी जाधव, वाल्मीक कोंडाजी जाधव आदी मुळ मालकांची नावे दाखल केल्याचे उतारे 7/12  संभाजी ब्रिगेड पंढरपूरच्या वतीने रामदास महाराज जाधव यांना देण्यात आले.    यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, ता.अध्यक्ष बाळासाहेब बागल, भगवान महाराज बागल, दत्ता पाटील, बालाजी अटकळे, स्वप्नील गायकवाड ,अमोल कुभांर आदी उपस्थित होते. 
 
Top