अलिबाग - विविध मंदिरात पायी दिंडीने जाणाऱ्या सेवकांनी महामार्गावरुन जाताना सायंकाळी किमान आपल्या सुरक्षेसाठी अंगावर परिधान केलेल्या टिशर्टवर व सोबत चालणाऱ्या वाहनांवर स्टिकर लावणे गरजेचे असून अशी आपली सुरक्षितता सांभाळावी असे भांडूप ते टिवळेश्वर देवरुखकडे जाणाऱ्या दिंडी सेवकांना जयपाल पाटील यांनी सांगितले. 

रामवाडी येथील गजानन महाराज मंदिरात ९० सेवकांसमोर आपत्ती व सुरक्षा तज्ञ जयपाल पाटील यांनी घर, वाहने, घरातील विजेची उपकरणे याची काळजी कशी घ्यावी हे सांगून सायंकाळी वस्तीच्या ठिकाणी पोहचण्यास कधी केव्हा अंधार पडतो अशावेळी पायी दिंडीने जाणाऱ्या सेवकांनी रस्त्याच्या बाजूच्या लाईनकडे असणाऱ्या सेवकांनी अंगावरील टिशर्टवर रिफ्लेक्टर लावावे. शक्यतो काळोखात दिंडी नेवू नये, असे नियोजन करावे. त्याचबरोबर १०८ चा वापर अपघाताच्या वेळी कसा करावा ? याचे प्रात्यक्षिक १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. पांडे व पायलट स्वप्निल म्हात्रे यांनी दिले. 

 कार्यक्रमाच्या सुरुवातीस पुलवामा येथील शहीद वाजनांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर जयपाल पाटील यांचा शाल, श्रीफळ ओमस्वामी उदयगिरी सेवा मंडळाचे अध्यक्ष रघुवीर जाधव यांनी सत्कार केला. तर मंडळाचे अध्यक्ष संतोष काताळकर यांनी मुंबईहून कोकणात सलग ९ वर्ष पायी दिंडी सन १९७६ साली स्वामी विद्यानंद गिरी यांनी मंदिर टिवळेश्वर येथे बांधल्याचे सांगितले. ही दिंडी १० दिवसात जात असून याचा समारोप महाशिवरात्रीच्या दिवशी होतो. या पायी दिंडी सेवकांचे स्वागत रामवाडीतील गजानन महाराज मंदिराचे पुजारी श्री. व सौ घैसास गुरुजी यांनी केले. तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ सेवक दत्ताराम भोजने यांनी केले. 

 
Top