शोधतो आहे फिरतो आहे तपासतो आहे पण भेटत नाहीत  

महात्मा गांधी, महात्मा फुलें ,कर्मवीर भाऊराव ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब..,,..!!१!!

फक्त पुतळे प्रतिष्ठानें संस्था अनुदानें यांची रेलचेल आहे 

जयंती पुण्यतिथी उत्सव यांची सुनामी आहे !!२!!

ज्यांचे हाती सूत्रे आहेत त्यांची पाउले उलटी पडत आहेत 

अनुदान अन त्यांची व्यवहारिक अड्जेस्टमेंट बेमालूम आहे !!३!!

हे सारे मतांच्या राजकारणाशी जोडलेले आहे 

कितीही प्रहार केले तरी त्यांची युती अभेद आहे !!४!!

ते सारे पोहचलेले आहेत त्यांचेवर अंशानेही परिणाम होत नाही 

सत्तेवर डावे वा उजवे पुरोगामी वा पारंपारिक त्यांना फरक पडत नाही !!५!!

जे निष्ठावंत अनुयायी आहेत ते पुजन वंदन यांत गुंतलें आहेत

सामान्य दुरुन डोंगर साजरे असं वागत आहेत !!६!!

आनंद कोठडीया,९४०४६९२२००

हे खरे आहे.....,,हे बरे आहे....

येथे पैशाने लोकशाही जिंकता येते हे खरे आहे 

कोठेही जा पैशानेच सर्व सोय होते हे बरे आहे !!१!!

येथे गुणवत्तेपेक्षा पैसा महत्वाचा हे खरे आहे 

मताची किंमत पैशात करतात हे बरे आहे !!२!!

येथे पैशाने संविधान बायपास करतात हे खरे आहे 

पैशानेच क्लिंनचीट मिळते हे बरे आहे !!३!!

येथे सत्तेवर येताच पैसा हे खरे आहे 

खुर्चीच पैसा ओढते हे मात्र बरे आहे !!४!!

येथे पैसा कोण  कसा मिळवतो सार अंधारात हे खरे आहे 

निवडून येताच हिशोब पूरा होतो हे बरे आहे !!५!!

आनंद कोठडीया,जेऊर ,करमाळा ,जि.सोलापूर ९४०४६९२२०० 

 
Top