पंढरपूर- चंदुकाका सराफ  सुवर्णपेढी तर्फे बारामतीचे शुध्द सोने असा लौकीक  असलेली सुवर्ण पेढी यांच्या तर्फे दिनांक २३ ते २६ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत सोने व हिऱ्यांच्या दागिण्यांचे भव्य प्रदर्शन फडे नर्सिंग होम, लक्ष्मी पथ, महावीर नगर पंढरपूर येथे आयोजित केले आहे.
   


या प्रदर्शनाचे उदघाटन माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते होणार असून, आमदार भारत भालके, नगराध्यक्षा साधना भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
 हे प्रदर्शन पंढरपूर येथील  व परिसरातील नागरीकांना सकाळी १०.३० ते सायंकाळी ८.३० पर्यंत  पहाता येणार आहे.पंढरपूर येथे अशा प्रदर्शनाचे आयोजन प्रथम होत असल्याचे चंदुकाका सराफ पेढीचे संचालक सिध्दार्थ शहा यांनी सांगितले.ग्राहकांच्या आवडी –निवडी नेहमीच प्राधान्य देणाऱ्या चंदुकाका सराफ पेढीने  प्रदर्शनात पंढरपूरकरांना व परिसरातील नागरीकांना वेगवेगळ्या  सोन्याच्या व हिऱ्यांच्या दागिण्यांची खरेदी  करता येणार आहे.  या प्रदर्शन कालावधीत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हि-यांच्या दागिण्यांच्या घडणावळी वर ४० टक्क्यांपर्यंत सुट मिळणार आहे. तसेच गोल्ड ट्री या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना चांदीचे नाणे हमखास भेट दिले जाणार आहे.
          

तरी या प्रदर्शनाचा लाभ पंढरपूर येथील  व परिसरातील नागरीकांनी घ्यावा असे आवाहन चंदुकाका सराफ पेढीचे संचालक सिध्दार्थ शहा यांनी केले आहे.
 
Top