आशिष बारकुल राज्यात प्रथम तर 

ओबीसी प्रवर्गातून महेश जमदाडे  प्रथम 

सोलापूर, १४ फेब्रुवारी : महाराष्ट्र लोकसभा आयोगातर्फे ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा- २०१८ चा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे. एकूण १३६ पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील आशिष बारकुलने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे तर ओबीसी प्रवर्गा तून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्या तील जैनवाडी येथील महेश जमदाडे  प्रथम आला आहे.

महिला वर्गवारीतून पुणे जिल्ह्यातील स्वाती किसन दाभाडे ही महिला राज्यात पहिली आली आहे.

  राज्य सेवा परीक्षा एप्रिल २०१८ मध्ये मुंबईसह अन्य राज्यांमध्ये घेण्यात आली होती. एकूण ३७ जिल्हा केंद्रावर या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परिक्षे साठी एकूण १९६६९५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. सदर परिक्षेमधून राज्य सेवा परीक्षेकरता २३८१ उमेदवार अर्हताप्रात्प ठरले होते.

 
Top