वसई - वसई विरार शहरातील अनेक उपहार गृहे, रिसॉर्ट आणि ढाब्यामध्ये बनावट पनीर वितरित केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार काल पोलिसांनी वसईतील अजय डेअरी आणि साईनाथ डेअरी या दोन ठिकाणी कारवाई करून तब्बल अडीच हजार किलो बनावट आणि भेसळयुक्त पनीर जप्त केले आहे.


यावेळी आरोग्यासाठी घातक असे भेसळयुक्त आणि बनावट पनीर बनवले जात असल्याचे आढळून आले. याठिकाणी अन्न सुरक्षेच्या कुठल्याही नियमांचे पालन न करता अत्यंत अस्वच्छ वातावरणात आरोग्यास हानिकारक पनीर बनविण्यात येत होते.

अजय डेअरी येथे अंदाजे ७०० किलो आणि साईनाथ डेअरी येथे १८०० किलो असे एकूण अडीच हजार किलो बनावट भेसळयुक्त बनावट पनीर आणि  पनीर बनविण्याचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत साडेसात लाख रुपये आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पनीरचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. या दोन्ही डेअरीचे युनिट बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 
Top