इचलकरंजी(प्रतिनिधी)- येथील नामवंत ब्रॅँडेड कपड्यांचे लेबल लावून बनावट माल विक्री केल्याप्रकरणी तिघांविरोधात गांवभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजन सुनिलकुमार पाटणी, सुनिल तिलोकचंद पाटणी (वय ५९), मधु सुनिल पाटणी (वय ५६, सर्व रा.कापड मार्केटसमोर, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १९ लाख ४ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सह्याद्री कॉपिराईट प्रोटेक्शन फर्मच्या आशिष शरदराव पाटील (रा.कोल्हापूर) यांनी दिली आहे

    त्यांनी याबाबत गांवभाग पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी राधाकृष्ण चित्रमंदीराजवळील आयकॉन इमारतीमधील ब्रॅन्ड किंग्डम नावाच्या दुकानावर छापा टाकला. यामध्ये एल पी, मुफ्ती, मोगुल, बिंग ह्युमन, सुपर ड्राय, टॉमी हायफायर, यु एस पोलो, इम्पोरिओ आरमानी, डिझेल, पॉल स्मिथ आदी कंपन्यांचा बनावट माल मिळून आला. या प्रकरणी संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून १९ लाख ४ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली.

 
Top