पुणे -अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव खासदार असलेल्या शिरूर मतदारसंघात लढण्याची तयारी असल्याचे वक्तव्य केले होते.मात्र शिरूर मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढविण्याच्या अजित पवार यांच्या बद्दलच्या चर्चेल खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी विराम दिला आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांसोबत बातचीत करताना अजित पवार यांच्या शिरूरच्या विधानावर भाष्य केले.  

त्यावर पवार यांनी बोलताना शिरूरमधून अजित पवार यांनी लढण्याची आवश्यकता नाही. माझ्याकडे अजून पाच ते सहा दावेदार असल्याचे सांगून या मुद्दा काढून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 
Top