पंढरपूर क्रेडाई संघटनेची ०१/०४/२०१९ पासुन पुढील २ वर्षासाठी नवीन कार्यकारणीची निवड सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने पार पडली. क्रेडाई संघटनेच्या अध्यक्ष पदी मुकुंद अनंत कर्वे यांची तर उपाध्यक्षपदी -प्रमोद कचरे , सचिवपदी-सचिन पंढरपूरकर, सहसचिवपदी- शशिकांत लोकरे, खजिनदारपदी- मिलींद देशपांडे व पि.आर.ओ पदी- विवेक परदेशी यांची निवड बिनविरोध करण्यात आली. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पदग्रहण समारंभ पार पडणार असल्याचे सांगण्यात आले. 


    क्रेडाई हि संपुर्ण भारतभर कार्यरत असुन, या संघटने मार्फत बांधकाम व्यवसायातील निर्माण होणारे समस्या चा सखोल अभ्यास करून त्यावर उपाय योजना सुचवली जाते त्यामुळेच स्वस्थ पण दर्जेदार बांधकाम करणे सुलभ होते त्याचाच फायदा अप्रत्यक्षपणे नागरिकांना होतो. 
    पंढरपूर शहराच्या जनतेला मदत होईल अशा प्रकारचे नियोजन करणार असल्याचे सांगितले, २०२२ परियंन्त ५०० सर्वसामान्याला परवडतील असे घरे निर्माण करण्याचा  संकल्प करण्यात आला, तसेच पंढरपूर शहराच्या विकासासाठी व सुशोभीकरणाच्या नियोजनासाठी क्रेडाई पंढरपुर नेहमी तत्पर राहिल असे नवीन कार्यकारणींनी सांगीतले.
 
Top