पंढरपूर (प्रतिनिधी)-कष्टकरी कामगार वर्गाच्या कल्याणासाठी आपले संपुर्ण आयुष्य समर्पित केलेले पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष दलितमित्र स्व.नारायणराव धोत्रे यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त रविवार दिनांंक १० फेबु्वारी रोजी पंढरपूरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होतेे.

रविवारी रामकृष्ण वृध्दाश्रम नविन कराड नाका येथे वृध्दांना मिष्टान्न भोजन देण्यात येणार आले. मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.जि.प.सदस्य वसंत देशमुखांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत कार्यक्रमास नगरसेवक संग्राम अभ्यंकर,नवनाथ रानगट,विवेक परदेशी,धर्मराज घोडके,अदित्य फत्तेपूरकर,मोहन पवार,भाजपाचे मा.शहराध्य क्ष दत्तासिंह रजपूत,गफुर धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 

  श्री गणेश रुग्णसेवा मंडळ संचलीत मुकबधीर विद्यालयात विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात येणार आले.मा.नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टे यांच्या हस्ते व मा.उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मिष्टान्न भोजन देण्यात आले.यावेळी  उपनगराध्यक्ष विशाल मलपे,नगरसेवक इब्राहीम बोहरी,राजू सर्वगोड,संजय निंबाळकर,बजरंग देवमारे,मालोजीराजे शेंबडे,अमोल डोके,अंकुश पवार,गणेश पवार आदी उपस्थित होते.

  नवजीवन निवासी अपंग शाळा ,क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आलेे.नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्या हस्ते तर मा.उपनगराध्यक्षा सुजाताताई बडवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास नगरसेविका शकुंतला नडगीरे,सुप्रिया डांगे,भाग्यश्री शिंदे,अनुसया शिरसट आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 शहिद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा येथे विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. मा.नगराध्यक्ष सतिश मुळे यांच्या शुभहस्ते तर मा.नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास नगरसेवक अनिल अभंगराव,विक्रम शिरसट,श्रीनिवास बोरगावकर,रामभाऊ माळी, सत्यविजय मोहोळकर,विकास टाकणे आदी उपस्थित होते.
हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवरत्न तरुण मंडळ,आदीशक्ती तरुण मंडळ,रामजाने तरुण मंडळ,न्यु वडार समाज गणेशोत्सव मंडळ,न्यु वडार समाज नवरात्र महोत्सव तरुण मंडळ,श्री गजानन महाराज भक्त मंडळ आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे कार्यक्रमाचे संयोजक मा.नगराध्यक्ष दगडू धोत्रे,समाजसेवक दत्तात्रय धोत्रे यांनी आभार मानले.
 
Top