शिवक्रांती युवा संघटना ल.टाकळी शाखेचा उपक्रम

शिवक्रांती युवा संघटनेच्या लक्ष्मी टाकळी शाखेने या वर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने संघटनेच्या वतीने ४३ महिला व २९ पुरुष तर २१ लहान बालकांना मोफत गडकिल्ले दर्शन घडवून एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.१५ फेब्रुवारी रोजी हे सर्वजण विशेष वाहना द्वारे सिंधुदुर्ग,विजयदुर्ग,देवगड गडकिल्ले दर्शनासाठी गेले होते ,अशी माहिती शिवक्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान देठे यांनी दिली.यावेळी ज्योतीबा दर्शनासह गणपतीपुळे आदी विविध धार्मिक स्थळांनाही भेटी देण्यात आल्या.शिवक्रांती संघटनेचा हा उपक्रम संघटनेचे संस्थापक  अध्यक्ष दत्तात्रय काळे आणि मेजर मोहन बापू देठे यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

     हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ भाकरे,महादेव घाडगे,बाळासाहेब सावंत,लखन देठे,धनाजी शिंदे,राजू रवळू,कृष्णा घाडगे,कुलदीप आयरे,चंद्रकांत आवटे,अविनाश रवळू,विजय रवळू,धनंजय खपाले,अनिल देठे आदींनी परिश्रम घेतले. 

 
Top