पंढरपूर -दिनांक ०७/०२/२०१९ रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची "मातोश्री" निवासस्थानी मुंबई येथे भेट घेऊन त्यांना श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचेवतीने समिती सदस्य व सोलापुर शिवसेना जिल्हा प्रमुख, पंढरपूर विभाग, संभाजीराजे शिंदे यांनी श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची "दैनंदिनी" व "कॅलेंडर" देऊन सन्मानित केले. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा झाली . 

त्यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे, वैभव मोरे, शिवसेना करमाळा तालुका प्रमुख सुधाकर लावंड, शिवसेना माढा तालुका प्रमुख मधुकर देशमुख, शिवसेना करमाळा शहर प्रमुख प्रविण कटारीया, शिवसेना कुर्डवाडी शहर प्रमुख समाधान दास व शिवसैनिक उपस्थित होते.   

 
Top