गोफणगुंडा:


त्यांना कांहीच  फरक पडत नाही

त्यांचा फक्त सत्तेवरच डोळा 

फिरवतात कौशल्याने नितीवर बोळा

येथे फुलतो लाचारांचाच मळा

वरसदारांचीच आरती त्यांच्या गळा 

जो तो होतो सत्तेसाठीच खुळा 

म्हणूनच प्रत्येकास साहेबांचाच लळा!!


जगावं कसं:वादळी दृष्टी 


जगणं डोळस असावं

अंध नसावं !!

जगणं पारदर्शक असावं

शंकास्पद नसावं!!

जगणं श्रमाचे असावं

आळसाचे नसावं !!

जगणं हिशोबी असावं

दिवाळखोरीच नसावं!!

जगणं ज्ञानाच असावं

अज्ञानाच नसावं!!

जगणं स्थैरतेचे असावं

अस्थिरतेच नसावं !!

जगणं माणुसकीचे असावं

कोरड नसावं!!

जगणं गोडीचं असावं

तोडीच नसावं !!

जगणं नीतीच असावं

अनैतिकतेच नसावं !!

जगणं गाणं असावं

नुसतं गुणगुणने नसावं!!

जगणं शुद्ध असावं

अशुद्ध नसावं!!

जगणं सुगंधी असावं

दुर्गंधीच नसावं !!

जगणं बुद्धीच असावं

मूर्खपणाचे नसावं !!

जगणं शांततेच असावं

बेधुंद नसावं !!

आनंद कोठडीया,९४०४६९२२००

 
Top