टोलनाका!!


तिने ईचारल "वेलनटाईन डे म्हंजी काय ?

मी गडबड्लो ,ऊत्तरलो "अग प्रेमाचा दिस "

तीनं झटका मारत इचारल ,

एरवी काय भांडायाच दिस हायती व्हय ?

मी म्हणालो ,अग तसं नव्हं 

आपुण जवा पहिल्या डाव 

भेटलु तवा कसं गुलगूलू करत व्हतो 

त्या दिवसाच्या आठवणीत आज दिस घालवायचा !

तीनंलगेच षटकार ठोकला "म्हंजी शिल्या कढिला उतू 

आणायचे व्हय "

काय चव आहे, तवा कसं अन आता कसं ?

आव लय घोळत व्हता नको तवा अंगात येतं व्हतं 

दिस रात समजत नव्हतं ,सारख भोवती फिरायचा 

आज बाहेर तुम्ही अन घरी आम्ही 

नशीब आठवण ठेवताय 

आता बोलून काय बी उपयोग नाय 

ऐक चांगल हाय आता प्रेमानं म्होर जगायचं हाय 

पोरं आपल्या म्होर गेली हायती 

तवा अपून शहाणपण शिकल पायजे "

अखेर मीच उतरलो "ह्योच वेलेंटाइन दिस हाय "  


गोफणगुंडा !!

सत्तेच्या नशेत  ते कायम बेहोष ,धुंदीत जगत होते  

सत्य काय हेही त्यांना औन्शानेही समजत नव्हते !!

चांगले वाईट ते पाहत नव्हते सावलीच्या मागे धावत होते 

आपले भान हरपलेले ,तेही त्यांना समजत नव्हते !!

वारसदाराच्या सुखासाठी लक्ष्मी हेच त्यांचे सूत्र त्यांना 

पळवत होते 

मात्र वारसदार शिक्षणापासून वंचित हेच त्यांना कळत नव्हते !!

सत्ता हेच सुखाचे साधन ,पैसा हेच  शक्तिस्थान ते मानत होते 

माणूस सोडून ते पशु सारखे जीवाचे  रान करत उधवस्त होत होते "!!

कोठे जायचे हेच त्यांना माहित नव्हते ते भ्रमातच  सुख मानत  होते 

अखेर मातीतच जायचे हेच त्यांना मातीत जाताना कळले होते "!!

आनंद कोठडीया,जेऊर ९४०४६९२२००

 
Top