प्रवेश नसतानाही शाळा ,महाविद्यालयाबाहेर विनाकारण घुटमळणाऱ्या रोडरोमिओंची पोलिसांनी धरपकड करुन चांगलीच धुलाई करावी. कारण संबंधितांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून आपल्या पाल्याचे प्रताप सांगितले तरी विशेष फरक पडणार नाही.शाळा , महाविद्यालया च्या परिसरात प्रवेश करून परिसरात फिरणाऱ्या युवकांची ओळखपत्रे तपासावीत तसेच त्यांच्याकडे असणाऱ्या वाहनांच्या कागदपत्रांचीही तपासणी करावी . वाहने ज्यांचा नावावर आहेत त्यांच्यावर कारवाई करावी म्हणजे  वाहन मालक वाहन देताना विचार करतील. मुले परवानगी नसतानाही विना कारण महाविद्यालयाच्या आवारात फिरताना आढळले तर पोलिसांनी संबंधित युवकांना पोलीस ठाण्यात नेऊन चोप द्यावा. शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश नसतानादेखील विनाकारण शाळा-महा विद्यालयांबाहेर टवाळखोर आणि टारगट तरुण वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, स्टंटबाजी करणे यासारखे उद्योग करत असतात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढते आणि यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो म्हणून अशा रोडरोमिओंवर वेळोवेळी कायदेशीर कठोर कारवाई करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तसेच ही कारवाई सातत्याने चालू ठेवावी . परवाच पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील एका    रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे .

    पालकांनी त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवून ते काय करतात? त्यांचे मित्र कोण आहेत ? हे पहावे. अनेक वेळा मुले गुन्हेगारीमध्ये न कळत अडकतात .त्यांना समजावून सांगत अपप्रवृत्तीपासून दूर राहण्याचा मार्ग दाखवावा.  

    टारगट मुलांनी व त्यांच्या पालकांनी दक्षता घ्यावी अन्यथा कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल असे  पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी इशारा दिला आहे .

 
Top