राज्यातून हजार मापाडी कामगार उपस्थित राहणार - शिवाजीराव शिंदे

 सोलापूर , प्रतिनिधी  - महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी परिषद महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील मापाडी कामगारांच्या राज्यव्यापी परिषदचे रविवार दि. १७ फेब्रुवारी २०१९ रोजी  सोलापूर येथे आयोजन केले असून  महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली, राज्याचे पणन व सहकारमंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते तसेच राज्य कामगार मंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते हमाल भवनचे उद्घाटन व दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याचे  महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस तथा सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी सांगितले.

या परिषदेस राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील मापाडी कामगार मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत . 
सदर परिषदेमध्ये सुभाष लोमटे, हरिष धुरट, राजकुमार घायाळ, विकास मगदुम, आप्प खताळ, हणमंत बहिरट आदी मार्गदर्शन करणार असून  सोलापूर कामगार आयुक्त निलेश यलगुंडे, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे, सचिव मोहनराव निंबाळकर आदी उपस्थित राहणार आहेत. 
ही परिषद पार करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष पांडूरंग साबळे, संचालक शिवानंद पुजारी, भिमा सिताफळे, दत्ता मुरूमकर, नागनाथ खंडागळे, गुरूशांत पुराणीक, गफूर चांदा, सिध्दराम हिप्परगी आदीसह सर्व हमाल तोलार कामगार परिश्रम घेत आहेत. 
 
Top