राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीत, असा खुलासा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार धनंजय महाडिक, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली.या बैठकी दरम्यान एका चॅनेलवर शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी ब्रेकिंग सुरू झाली. त्यावरून सोशल मीडियावर राजकीय चर्चेला उधाण आले. या बाबतची माहिती बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना समजताच त्यांनी बैठकीमधून बाहेर येत ‘शरद पवार हे निवडणूक लढवणार नाही’, असा खुलासा केला. यामुळे शरद पवार निवडणूक लढवणार नाही या चर्चेला तूर्तासतरी पूर्णविराम मिळाला आहे.

 
Top