कुरुंदवाड येथील सुधारित नळ पाणीपुरवठा योजना कधी पूर्ण होणार असा जाब  मुख्याधिकारी नागेंद्र मूतगेकर, नगराध्यक्ष  जयराम पाटील यांना गुरुवारी सकाळी ११ वाजता  विचारत शिवसेना शहर प्रमुख राजू आवळे यांनी आपल्या जवळील कॅन मधील रॉकेल स्वतःवर ओतुन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यामुळे मुख्याधिकारी दालनात काही काळ गोंधळ निर्माण झाला.येत्या ५ मार्च रोजी विशेष सभेत ठोस निर्णय घेतला जाईल असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शिवसेनेनं आंदोलन मागे घेतले.

 कुरुंदवाड येथील सुधारित नळ पाणी पुरवठा योजना गेली ३२ महिने झाली रखडलीय .यामुळे शहरातील जनतेला पाणी कधी मिळणार असा प्रश्न सर्वांनाच पडलाय या योजनेचा ठेका व्हीस्टकोअर कम्पनीकडे असून अद्याप १० टक्केही काम पूर्ण नाही. शहराला पाणी मिळावे यासाठी शिवसेना शहर प्रमुख राजू आवळेसह शिवसेनेनं वेळोवेळी आंदोलन छेडले आहे .तरीही पाणी प्रश्नच घोंगड भिजत पडलय.यामुळे शिवसेना शहर प्रमुख राजू आवळे यांनी आपल्या जवळील कॅन मधील रॉकेल अंगावर ओतून घेतले.

 
Top