पंढरपूर दि.१६ :ग्रामीण भागात  दळण-वळणाच्या चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी ग्रामीण भागात रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री विजय देशमुख यांनी दिली.

माळशिरस तालुक्यातील जांबुड-निमगाव-पिलीव, अकलूज-निमगाव-पिलीव-बचेरी-इटकी या रस्त्यांच्या कामांचे भूमि पूजन पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य ज्योती पाटील,रणजित जाधव,के.के.पाटील,निमगाव च्या सरपंच आरती मगर यांच्यासह परिसरातील गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री विजय देशमुख म्हणाले, ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होण्यासाठी राज्य शासनाने  ग्रामीण भागात  विकास कामांबरोबरच रस्ते विकासाचा भरीव  कार्यक्रम हाती घेतला आहे. चांगल्या दर्जेदार रस्त्यांमुळे शेतकऱ्यांचा माल त्वरित बाजारपेठेत पोहचून मालाला योग्य भाव  मिळेल.

पालकमंत्री श्री.देशमुख म्हणाले, निमगाव व परिसरातील जनतेस पाणी पुरवठा व्हावा यासाठी निमगाव येथील टॅंक भरण्याबाबत कालवा समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. जांबुड-निमगाव पिलीव,अकलूज-निमगाव-पिलीव-बचेरी-इटकी या रस्त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांची सोय होईल.

 
Top