पंढरपूर - येथील दर्शन मंडप चौक येथे जय महाराष्ट्र् युवा मंच तर्फे  शिवजयंती साजरी करण्यात आली . यावेळी सांगोल्याचे तहसीलदार किशोर बडवे यांच्या हस्ते शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
श्री छ.शिवाजी महाराज यांच्या विचारावर आजच्या युवकांनी जीवनाची  वाटचाल करावी असे मत श्री बडवे यांनी  आपल्या भाषणात व्यक्त केले .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय महाराष्ट्र युवा मंचाचे सदस्य व दर्शन मंडप तरुण मंडळच्या सदस्यांनी परिश्रम घेतले .यावेळी परिसरातील  बहुसंख्य नागरिक उपस्थित  होते .आभार मंचाचे  संस्थापक राम साळुंखे यांनी मानले
 
Top