मोफत सर्वरोग निदान व औषधोपचार शिबीर कार्यक्रम संपन्न

पंढरपुर (प्रतिनिधी) दि.१७ - जनकल्याण हॉस्पिटल गरिबांचे आधारवड असून पंढरीच्या नगरीत अत्याधुनिक आरोग्यसेवा पुरविण्याबरोबर  ग्रामीण व शहरी नागरिकांच्या विश्वास संपादन करून खर्या अर्थाने जनकल्याण नाव सार्थ केले असल्याचे मत आमदार भारत भालके यांनी व्यक्त केले. 

सहकार शिरोमणी वसंतराव (दादा) काळे यांच्या अमृतमहोत्सवी जयंती निमित्त वसंतदादा मेडिकल फाऊंडेशन संचलित जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर यांचे वतीने मोफत सर्वरोग निदान व औषधोपचार शिबीर कार्यक्रम उदघाटन प्रसंगी आमदार भारत भालके बोलत होते.

जनकल्याण हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल आजारांच्या रुग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरविण्यात येते असून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, व इतर योजनांच्या माध्यमातून अनेक गरीब रुग्णांवर उपचार करण्यात आले, अत्यंत गरीब रुग्णांवर कमी दरामध्ये उच्चतम दर्जाची सेवा देऊन नागरिकांना आधार देण्याचे काम जनकल्याण हॉस्पिटलने केले असल्याचे डॉ.व्हि.एस.आपटे यांनी सांगितले .  

याप्रसंगी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, पंढरपूर नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संग्राम गायकवाड,  वसंतदादा मेडिकल फौंडेशनच्या अध्यक्षा संगीताताई काळे,आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. पंकज गायकवाड, धनंजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

  कार्यक्रमास समाधान काळे, महादेव देठे, तानाजी सरदार,नागेश फाटे,इब्राहिम मुजावर,सुधाकर कवडे, विष्णू यलमर, शहाजी साळुंखे,मोहन नागटिळक, अर्जुन जाधव,जयसिंह देशमुख, राजसिंह माने, दत्ता बागल, शकूर बागवान, बापू घंटी, मोहन नागटिळक, हणमंत मोरे,सुरेश देठे, हणमंत सुरवसे,विश्वंभर काशीद, अँड.राजेश भादुले, किरण घाडगे, संजय घोडके, संदीप मुटकुळे, ,डॉ.मिलिंद चौधरी,डॉ.आनंद कुलकर्णी, डॉ.महेश सुडके, डॉ.रसिका  कुलकर्णी, डॉ.संजय पाटील, डॉ.अमित मेनकुदळे,डॉ.सागर गांधी, डॉ.शिंदे,डॉ.मनोज भायगुडे,,डॉ.अमृता म्हेत्रे,डॉ.वैभवी भोसले,डॉ.अनिल काळे,डॉ.सत्यवान बागल तसेच विविध संस्थेचे पदधिकारी उपस्थित होते . एकूण १२४३ रुग्णाची तपासणी करून उपचार करण्यात आले व २७१ रुग्णाची नेत्रतपासनी करून १६५ जणांना मोफत चष्मे देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर कवडे यांनी केले . आभार भारत शिंदे यांनी मानले. 

 
Top