पंढरपूर- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वेरीमध्ये उत्कृष्ठ पद्धतीने शिक्षण मिळत असून एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना मार्केटींग करताना आपल्या उत्पादनाचे जेवढ्या उत्कृष्ठ पद्धतीने सादरीकरण करता येईल तेवढ्या पद्धतीने ग्राहकांना सादरीकरणाद्वारे  पटवून द्यावे लागते. हे कार्य ज्यांना उत्तम पद्धतीने जमते तोच विद्यार्थी एम.बी.ए. मध्ये यशस्वी होतो आणि भविष्यात आपल्या उत्पादनाचा ते उत्कृष्ठ पद्धतीने सादरीकरण करून मोठे उद्योजक बनतात.’ असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा स्पर्धा परीक्षेत राज्यात प्रथम आलेले व नूतन उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे यांनी केले.

      स्वेरीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंतर्गत असलेल्या एम.बी.ए. मधील विद्यार्थ्यांना मार्केटींगचा अभ्यास करण्यासाठी टिळक स्मारक मैदानावरट्रेडएक्स्पो २०१९ हा ग्राहकांसाठी आयोजिलेल्या मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे हे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. 

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष धनाजी देशमुख होते.प्रास्तविक एम.बी. ए.चे विभाग प्रमुख प्रा.करण पाटील यांनी  केले. या तीन दिवसांच्या मेळाव्याला दुसऱ्या दिवशीही प्रचंड गर्दी  दिसत  होती.    २०१९’ च्या माध्यमातून कृषी व ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले आहे. विक्रेते, ग्राहकांच्या फायद्याबरोबरच विद्यार्थ्यांना देखील शिक्षण मिळणार आहे.हा प विद्यार्थी अवैभव साळुंखे, संकेत हळणवर,ओंकार सूर्यवंशी यांचा सत्कार केला.उदघाटन तिरुपती कन्स्ट्रक्शन प्रमोटर अँड डेव्हलपर्स चे शार्दुल नलबिलवार यांनी केले.ट्रेडएक्स्पो २०१९ या ग्राहक व कृषी मेळाव्यात विविध कंपन्यांनी आपले प्रोडक्ट विक्री व प्रदर्शनासाठी ठेवले असून यामध्ये आकर्षक व सवलतीच्या दरात शेती विषयक अवजारे व उत्पादने, टू व्हीलरफोर व्हीलरइलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रीकल वस्तू व साहित्यरेडीमेड कपडेट्रॅक्टरठिबक सिंचन,विमा योजना,गृहोपयोगी वस्तू, पुस्तकेमोबाईल व त्याचे साहित्य तसेच इतर गरजेचे साहित्य प्रदर्शन व विक्री योजनेत होत्या. 

यावेळी पंढरपूर शहरातील नागरिक, सागर कौलवार व अर्जुन बसटवार, सागर संत, पालक प्रतिनिधी माऊली हळणवर, ग्राहक, स्वेरीचे संस्थापक सचिव आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, विश्वस्त सुरज रोंगे, डॉ. विश्वास मोरे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, प्राध्यापक वर्ग व एम.बी.ए.मधील विद्यार्थी आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रा.प्रवीण मोरे यांनी केले. ओंकार सूर्यवंशी यांनी आभार  मानले.

 
Top