पंढरपूर- चंदुकाका सराफ  सुवर्णपेढी तर्फे बारामतीचे शुध्द सोने असा लौकीक  असलेली सुवर्ण पेढी यांच्या तर्फे दिनांक २३ ते २६ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत सोने व हिऱ्यांच्या दागिण्यांचे भव्य प्रदर्शन फडे नर्सिंग होम, लक्ष्मी पथ, महावीर नगर पंढरपूर येथे आयोजित केले आहे.पंढरपूर येथे अशा प्रदर्शनाचे आयोजन प्रथम होत असल्याचे चंदुकाका सराफ पेढीचे संचालक सिध्दार्थ शहा यांनी सांगितले.ग्राहकांच्या आवडी –निवडी नेहमीच प्राधान्य देणाऱ्या चंदुकाका सराफ पेढीने  प्रदर्शनात पंढरपूरकरांना व परिसरातील नागरीकांना वेगवेगळ्या  सोन्याच्या व हिऱ्यांच्या दागिण्यांची खरेदी  करता येणार आहे.  या प्रदर्शन कालावधीत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हि-यांच्या दागिण्यांच्या घडणावळी वर ४० टक्क्यांपर्यंत सुट मिळणार आहे. तसेच गोल्ड ट्री या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना चांदीचे नाणे हमखास भेट दिले जाणार आहे.
चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा.लि.यांच्या पंढरपूर येथील सोने, हिरे आणि नवरत्न ज्वेलरीच्या प्रदर्शनामध्ये सोने व हिरे दागिन्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.हिरे उच्च प्रतीचे असून इतरांपेक्षा कमी भाव असल्यामूळे हिऱ्यांच्या दागिन्यांना मोठ्या प्रमाणात  ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत सुमारे 3000 ग्राहकांनी भेट दिली आहे. हे नवीन डिझाइनचे कलेक्शन सुरू आहे तरी सर्व ग्राहकांनी अवश्य भेट द्यावी .
 
Top