मुंबई : जवळ आलेल्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्त  भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, “भारत के मन की बात, मोदी के साथ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून तब्ब्ल महिनाभर चालणाऱ्या या कार्यक्रमामधून भाजप आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आपल्या घोषणापत्रात कोणत्या मुद्यांचा समावेश करावा याबाबत व्यापक जनमत घेणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी पत्रकारांनी काँग्रेसद्वारा लावण्यात आलेल्या राफेल करारावरील आरोपांबाबत बोलताना गोयल म्हणाले, “आम्ही निवडणुकांसाठी देशभरामध्ये फिरत आहोत मात्र कोणीही आम्हाला राफेल कराराबाबत विचारलं नाही यामागे एकच कारण आहे आणि ते म्हणजे देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असलेला विश्वास.”विरोधकांकडून मागील काही काळापासून सुरु असलेल्या राफेल करारातील कथित घोटाळ्याच्या आरोपांवर बोलताना, “विरोधकांनी राफेल करारावरून लावलेले आरोप हे निराधार असल्याने आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपवर कोणताही परिणाम पडणार नाही.”असा विश्वास व्यक्त केला.

 
Top