पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी श्री सिद्धिविनायक मंदिराकडून ५१ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. शिवाय, पुण्यातील जायबंदी जवानांसाठी काम करणाऱ्या क्विन मेरी संस्थेला देखील २५ लाखांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री सिद्धिविनायक संस्थेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी ही माहिती दिली आहे. विश्वस्त मंडळाची तातडीची बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

 
Top