पंढरपूर -पंढरपूर नगरपरिषद व योगविद्याधाम यांच्या संयुक्त विद्यमाने रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त सावरकर वाचनालय येथे मंगळवार दि १२ फेब्रुवारी रोजी सकाळी  वा योगतज्ञ व योग शिक्षक अशोक ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली  सामुदायिक ५१ सूर्यनमस्कार घालून सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला व सकाळी ६.३० वा योगभवन येथे योग शिक्षक सुनील वाळूजकर, प्रशांत आगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ५१ सूर्यनमस्कार घालून सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला. नगरसेवक विवेक परदेशी यांच्या नियोजनाने पंढरपुर नगरपरिषद संचलित लोकमान्य विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी सूर्यनमस्कार प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.योगतज्ञ अशोक ननवरे यांनी सुर्यनमस्काराचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले.

कार्यक्रमाचे उद्घाटन उपनगराध्यक्ष नागेश भोसले  यांच्या हस्ते,उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांच्या अध्यक्षते खाली व नगरसेवक विवेक परदेशी,पं.न.प.नूतन नियुक्त सह. मालमत्ता पर्यवेक्षक प्रियांका पाटील,नूतन उपलेखापरिक्षक अभिलाषा नेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. 

या प्रसंगी  बोलताना उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी सांगितले की,आज संपूर्ण भारतात तसेच जगभरात सूर्यनमस्कारयोग साधनेचे महत्व लक्षात घेवुन नागरिकांमध्ये योगाचे महत्व लक्षात यावे म्हणुन हे सूर्यनमस्काराचे अभियान राबविण्यात येत आहे. 

नागेश भोसले यांनी सांगितले की दररोज योग साधना केल्यास मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहते त्यामुळे नियमितपणे सर्वांनी योग साधना,सूर्यनमस्कार करावेत.    उपलेखापरिक्षक अभिलाषा नेरे ,गोवर्धन भट्टड यांनी विद्यार्थ्यांना सूर्य देवाचे व सूर्यनमस्काराचे महत्व सांगितले. 

 नगरसेवक विवेक परदेशी यांनी स्वागत करुन योगाच्या प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली व त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच व्यायामाची आवड लागली तर ती आयुष्यभर टिकते व शरीर निरोगी राहतेखेळ व व्यायामामुळे आरोग्य सुधारते . 

प्रकल्प संचालक योग विद्या धामचे प्रमुख अशोक ननवरे सर यांनी सुर्य नमस्काराचे महत्व ,इतिहास व संशोधनात्मक माहिती सांगितली.आदर्श प्रात्यक्षिके दाखविली व विद्यार्थ्यांनी सामुदायिक सूर्यनमस्कार घातले . कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.

       मुख्याध्यापक श्री डिंगरे सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.सूत्रसंचालन श्री पठाण सर यांनी केले. आभार पवार सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगशिक्षक शाहुराजे जाधवसुनील यरगट्टीकर, अभय आराध्ये तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका ,सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 
Top