भाग्य आमुचे थोर जन्मलो आम्ही  महाराष्ट्रात येथे

थोर राजा अमुचा शिवराया मराठी बाणा येथे !!१!!


ज्ञानदेवांचे पसायदान तुकोबांचे अभंग अमर येथे

ग्यानबा तुकाराम हर हर महादेव आवाज मराठीचा घुमतो येथे !!२!!


मराठी आमुची मायबोली वैभव तिचे नांदते येथे

अनुभवतो अमृत  वाहता झरा मराठीचा मुखी येथे !!३!!


शब्दच रत्ने शब्दाची खाण अलंकारांची रास येथे

खोपा मराठीचा झुलतो बहिणाबाईच्या रचनेत येथे !!४!!


लावणी लावते वेड देवही धरती ताल येथे

भूपाळी देते साक्ष समृद्धीची मराठीचे खळे येथे !!५!!


मराठी आमुची आई गवसणी घाली विश्वा येथे

देवही डुलतो आयकता स्वर मराठीचा येथे!!६!!


अशी मराठी थोर शब्दांचा महासागर येथे

बोलता लिहता मराठी अनुभवतो अमृत आम्हीं येथे!!६!!


आनंद कोठडीया,जेऊर ,९४०४६९२२००

 
Top