पंढरपूर (प्रतिनिधी):- आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन व जिल्हा सायकलिंग असोसिएशनस् सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरीत दि.१० फेब्रुवारी २०१९ रोजी ‘पंढरी सायकल मॅरेथॉन’ चे आयोजन केले आहे. सकाळी ६ वा. ३० मि. वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या मॅरेथॉनचा शुभारंभ होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक-सावरकर चौक-इंदिरा गांधी चौक-महात्मा बसवेश्‍वर चौक (अर्बन बँक)--भादुले चौक मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा मार्गाने ही सायकल मॅरेथॉन पार पडेल.
मॅरेथॉन संपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार्‍या प्रत्येकाला प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्वांनी सायकल घेऊन वरील तारखेस व वेळेत मॅरेथॉन सुरु होण्याच्या ठिकाणी यावे व पंढरपूरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या मॅरेथॉनमध्ये  सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 
 
Top